सुस्वागतम्

माझ्या सर्व इतिहासप्रेमी मित्रांनो !
डॉ सूर्यकांत कापशीकर कडून आपणास मानाचा मुजरा !!
 'जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही.' डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यथार्थ शब्दात इतिहासाचे महत्व विशद केले आहे. नक्कीच!  जर आपले  भविष्य उज्ज्वल  करायचे असेल तर आपल्याला इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण आपले भविष्य घडविण्यामध्ये इतिहास हा महत्वाची भूमिका बजावत असतो. परंतु बऱ्याच लोकांना इतिहास हा रुक्ष विषय वाटतो. भूतकाळातील इतिहासाचा आपल्या जीवनाशी काय संबंध असा प्रश्न अनेकांच्या मनात नेहमी निर्माण होत असतो. वास्तविक पाहता प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी इतिहास असतोच. अगदी डॉक्टर सुद्धा पेशंटला तपासण्यापूर्वी त्याची हिस्ट्री तपासतात. कारण त्याची हिस्ट्री जाणून घेतल्यावरच त्याला कोणते औषध द्यावे हे डॉक्टर ठरवीत असतो. आजच्या गुंतागुतीच्या जीवनात सुद्धा एकमेकांचा इतिहास माहित असल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. इतिहासामुळे आपणास अर्थबोध आणि तत्वबोध होतो, इतिहासाच्या अभ्यासाने आकलनशक्ती वाढते एवढेच नाहीतर इतिहासामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. काळ-वेळ आणि समाजभान सुद्धा इतिहासाच्या अभ्यासामुळेच कळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहासामुळे राष्ट्रवादाचा विकास होतो. म्हणून आजच्या पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी खरा इतिहास सर्वांना माहित व्हावा यासाठी 'इतिहासप्रबोधिनी' हे नव विचारपीठ  आपणासमोर सादर करीत आहो. आपण या उपक्रमास उदंड प्रतिसाद द्यावी हीच अपेक्षा!